Surprise Me!

किशोर तिवारी यांची महिला अधिकाऱ्याला दमबाजी | Yavatmal

2021-09-13 15 Dailymotion

यवतमाळ : वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी
यांच्याविरोधात महसूल संघटना आक्रमक झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीच्या तहसीलदार पूजा माटोडे यांच्याबाबत अपशब्द बोलून अपमानित केल्याचा तिवारींवर आरोप आहे. याविरोधात महसूल विभागाच्या सात कर्मचारी संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. किशोर तिवारींचा निषेध नोंदवत संघटनांनी शुक्रवारी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, तिवारींनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
किशोर तिवारी यांनी घाटंजी येथे कर्ज मेळाव्याबाबत जनसभा वजा बैठक घेतली. बैठकीची नियोजित वेळ सकाळी 11 ची असताना अध्यक्ष 1.30 वाजता सभास्थळी आल्याचा संघटनांचा दावा आहे. तहसीलदार कार्यालयीन काम असल्याने कार्यालयात होत्या. बैठकीसाठी नायब तहसीलदार यांच्यासोबत इतर अधिकार्‍यांना पाठवलं आणि मिशनचे अध्यक्ष आल्यानंतर त्याबाबत कळवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
या बैठकीत किशोर तिवारी यांनी महिला तहसीलदारांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप होतोय. याशिवाय नायब तहसीलदार यांनाही अपमानित केल्याचा आरोप तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने केला आहे. एका तहसीलदाराला धमकीवजा फोन करतांनाचा किशोर तिवारी यांचा औडिवो प्रचंड वायरल होतो आहे . आपण बघत असलेल्या vdo मध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी हे केवळ त्यांच्यामुळेच पांढरकवडा येथे आले असे त्यांनी प्रतित केले आहे .. भाजपा गोटातुन अद्याप प्रतिक्रिया आली नाही. वारंवार होणार्‍या या अपमानामुळे महसूल विभागाच्या सर्व संघटनांनी दंड थोपटले असून, किशोर तिवारी यांचा निषेध नोंदवत शुक्रवारी बंद पुकारला आहे.
या संपात तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना, वाहनचालक, चर्तुर्थश्रेणी कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांचा समावेश आहे. सर्व संघटनांनी लेखी माफीनामा मागितला आहे. तो न दिल्यास पुढील आंदोलनाची दिशा शुक्रवारी ठरविणार असल्याचं सांगितलं.

किशोर तिवारींचं स्पष्टीकरण
“पीककर्ज वाटपाचा अहवाल विचारला तरी पूजा मॅडम या कार्यालयात बसून होत्या. त्यांनी नायब तहसीलदाराला पाठवलं. या मॅडम समाजसेवक, शेतकरी यांचा सतत अपमान करतात आणि प्रत्येक कामाला जीआर मागतात, अशा पत्रकारांच

Buy Now on CodeCanyon